आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलींचे वाटप:कलदेव निंबाळा येथे वीस मुलींना सायकलीचे वितरण

उमरगा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील शहीद भगतसिंग विद्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त सरपंच सुनिता पावशेरे यांच्या हस्ते शाळेतील मुलींना संस्था आणि कर्मचाऱ्यांच्यावतीने २० सायकलींचे वाटप करण्यात आले. संस्था सचिव एम एच शेख अध्यक्षस्थानी होते.

विद्यालयात गाव व परिसरातील विद्यार्थींनीनी विद्यालयात शिक्षण घेत असून येण्या-जाण्यासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी संस्था व कर्मचाऱ्यांनी विद्यालयाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम आयोजित केला. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सोमवारी (०१) विद्यालयात आयोजित कार्यक्रमात सरपंच सौ पावशेरे यांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले सचिव श्री शेख यांनीही विचार मांडले.

यावेळी मुख्याध्यापक प्रमोद तावशीकर, गिरीजाल, पोलीस पाटील पांडूरंग पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालाजी पाटील, कलाकार पाटील, उत्तम सरवदे, मारुती सुरवसे, मल्लिनाथ कारभारी, सहशिक्षक श्रीमती मेघा मते, यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षक निळकंठ रेऊरे यांनी सुत्रसंचलन केले. रतन सुर्यवंशी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...