आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:अपंग दिन व सप्ताहानिमित्त  दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप

अनाळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील अनाळा येथे जागतिक अपंग दिन व ३ ते१० डिसेंबर दरम्यान अपंग सप्ताह निमित्त ग्रामपंचायत च्या वतीने ५ टक्के निधीतुन दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, सरपंच अंबिका क्षीरसागर यांच्या हस्ते अनाळा येथील ३० अपंग बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सैन्य दलामध्ये ३० वर्षे दिवस सेवा करून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.कार्ला गावचे सुपुत्र मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विनोद शिंदे यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्यामुळे सन्मान करण्यात आला.

यावेळी ज्योतीराम क्षीरसागर, उपसरपंच कल्याण शिंदे ग्रामपंचायत सदस्य अजित शिंदे, चांगदेव चव्हाण, अशोक शिंदे ,विनोद कदम, दादासाहेब फराटे, सीमा अंकुश, परंडा तालुका दिव्यांग उद्योग समुहाचे अध्यक्ष तानाजी घोडके, तालुका सचिव पांडुरंग मिसाळ, निशिकांत क्षिरसागर, प्रगतशील शेतकरी बिबीशन शिंदे, भाऊसाहेब क्षिरसागर, रेवन्नाथ शिंदे ,हनुमंत जाधव, साजिद शेख, मुकुंद रीटे, ग्रामसेवक विठ्ठल गोसकेवार, दादा चव्हाण, समाधान गोडसे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...