आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुकामेव्याचे वाटप:नववर्षानिमित्त पहाटे फिरायला येणाऱ्यांना सुकामेव्याचे वाटप

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे नव वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे वॉकिंगला येणाऱ्या नागरिकांना माजी सरपंच सुनिता पावशेरे यांच्या वतीने महिला, युवक, युवती आणि ज्येष्ठांना सुकामेव्यााची कीट देवून नववर्षाचे स्वागत केले.

कलदेव निंबाळा गावात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि युवती नियमितपणे पहाटेच्या शुद्ध वातावरणात फिरण्यास यावे, जेणेकरून दिवसभर प्रसन्नता राहील अन् आरोग्यही तंदुरुस्त राहील या हेतूने गावातील ज्येष्ठ नागरिक, महिलांना आणि युवकांना सुनिता पावशेरे व देविदास पावशेरे दांपत्य सातत्याने प्रोत्साहित करत आहेत. यावेळी सकाळी मॉर्निंग वॉक करण्यसासाठी गेल्यानंतर योगासने, अन्य व्यायाम करण्यात येतात. ग्रामीण भागातील महिला, नागरिक, ज्येष्ठ नागरिक व युवक-युवती आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात.

त्यामुळे अनेक विकार उद्भवतात. त्यामुळे गावातील गुड मॉर्निंग अन् महिला ग्रुपवर याबाबत माहिती व प्रबोधन करण्यात येत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून पहाटे महिला, युवती, नागरिक, युवक अन् विद्यार्थ्यांचे व्यायामाचे व फिरण्यास येण्याचे प्रमाण वाढल्याचे पल्लवी डोणगावे यांनी सांगितले. पावशेरे दांपत्याने नववर्षाचे स्वागत अनोख्या पध्दतीने केले असून मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांना सुकामेव्याचे कीट दिले आहे.

त्यामध्ये काजू, बादाम, खारीक, अंजीर, मनुके, खजूर आहेत. यावेळी लताताई बलसुरे, पल्लवी पाटील, विद्या डोणगावे, जनाबाई कल्याणकर, मंकावती घोटमाळे, मंगल पावशेरे, अर्चना बलसुरे, जयश्री बिराजदार, पार्वती पावशेरे, जयश्री पावशेरे, पद्मीन डोणगावे, जनाबाई बिराजदार, तुकाराम बिराजदार, राजेंद्र पाटील, धीरज पवार, सुनिल बलसुरे, राहुल डोणगावे, संतोष घोटमाळे, शैलश पाटील यासह युवक अन् महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...