आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक उपक्रमातून अभिवादन:होळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा तालुक्यात होळी येथील समाज जागृती सम्राट मित्रमंडळाच्या युवकांनी बौद्धिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वही, पेन इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत विधायक उपक्रमातून अभिवादन केले.

प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात सरपंच सरोजा ओम बिराजदार यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस डी कारभारी,प्रा सुखदेव होळीकर,संजय कांबळे, करण बाबळसुरे, दत्ताभाऊ गायकवाड,तंटामुक्त अध्यक्ष रामभाऊ जाधव, पोलीस पाटील अंकुश गायकवाड, शाळा समितीचे अध्यक्ष बजरंग जाधव, बळीराम सुरवसे, लक्ष्मण राठोड, मुख्याध्यापक मधुकर गायकवाड आदींची उपस्थिती होती.

यावेळी गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी शंकर सुरवसे, केशव सरवदे, संजय माळी, किशोर गायकवाड, विठ्ठल मोरे, संजय बिराजदार, बालाजी गायकवाड, सम्राट मित्रमंडळाचे पदाधिकारी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले रात्री भीम गीताच्या माध्यमातून समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उमरगा येथील कलाकार सोनकांबळे, सुभाष काळे, जी. एल. कांबळे, मनोजकुमार मोरे, बालाजी गायकवाड, संजय कांबळे, दत्ता गायकवाड यांनी भीमगिते सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

बातम्या आणखी आहेत...