आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाकेगाव येथील शहनाज अमीन भोईटे नावाच्या महिलेकडे बनावट नाेटा सापडल्यानंतर पोलिसांनी नाचणखेडा (ता.जामनेर) येथील हनिफ अहमद शरीफ देशमुख यालाही ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान तो तीन महिन्यांपासून त्याच्या घरातील एका खोलीत बनावट नोटा तयार करत होता. आतापर्यंत त्याने जळगावात सुप्रीम काॅलनी, एमआयडीसी, कुसुंबा व साकेगाव या परिसरात सुमारे ४ लाख रुपये मूल्याच्या १०० व २०० रुपयांच्या बनावट नोटा वितरित केल्याचे समोर आले. भुसावळ पोलिसांनी साकेगाव येथे शहनाज नावाच्या महिलेच्या घरातून २१७०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. गुन्ह्याच्या चौकशीत नाचणखेडा येथील हनिफ देशमुख याचे नाव समोर येताच पोलिसांनी त्यालाही अटक केली. यानंतर त्याने जळगाव येथे दुरुस्तीसाठी टाकलेले प्रिंटर, स्कॅनर जप्त केले. या दाेन्ही संशयितांच्या पोलिस काेठडीची मुदत मंगळवारी संपल्याने त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पोलिस काेठडीची मुदत वाढवली.
संस्थेचे अध्यक्ष डाॅ. शे.हारून शे. इक्बाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे, रागिणी चव्हाण, एजाज शेख, सहायक पाेलिस निरीक्षक जालिंदर पळे, गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे आदी उपस्थित हाेते. राजू पटेल यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.