आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:भाऊसाहेब बिराजदार साखर कारखानास्थळी धान्य वितरण ; नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील समुद्राळ येथील क्युनर्जी इन्डस्ट्रीजच्या भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगार यांना पोर्टिबिलिटीद्वारे मंगळवारी (२२) धान्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यामध्ये कामाला आलेल्या उसतोड मजूरांना साखर कारखान्याच्या ठिकाणी रेशन धान्य वितरीत करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार मंगळवारी तालुक्यातील समुद्राळ येथील क्युनर्जी इन्डस्ट्रीजच्या भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या ठिकाणी विविध जिल्हयातून, परराज्यातून आलेल्या ऊसतोड साठी आलेल्या मजुरांना स्वस्त धान्य वितरणास सुरुवात केलेले असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पोर्टबिलिटीद्वारे धान्य वाटप केले जात आहे.

सदर वाटप कारखाना ठिकाणी हंगाम संपेपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे परजिल्हयातील, परराज्यातील उसतोड मजुरांची कामासाठी स्थलांतरामुळे रेशन अभावी होणारी अडचण दूर होणार आहे. कारखाना स्थळी शासकीय धान्य उपलब्ध होत असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी उमरगा प्रभारी तहसीलदार शिवाजी कदम, नायब तहसीलदार पुरवठा विभाग सचिन काळे, अव्वल कारकून गजानन नरवाडे, समुद्राळ स्वस्त धान्य दुकानदार ए. आर. नागणे, कारखाना शेतकी अधिकारी सुरेश त्रिगुळे,समाधान दुधभाते, घुमरे, श्री टकले उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...