आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्माानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद शाळा पेठ येथील विविध स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध, लंगडी, धावणे, पोत्यातील उड्या आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.६) विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
शाळेतील निबंध स्पर्धेत सिध्दी बालाजी आंधळे, प्राची बबन कोकरे, अमृता मोहन भोंडवे, जिदान महामुद शेख, धावण्याच्या स्पर्धेत मुलींमध्ये अक्षरा बालाजी माने, सीया नवनाथ थोरात, देवयानी गुरुनाथ कोकरे, मुलांमध्ये संग्राम नागनाथ टेळे, सार्थक दत्ता कोकरे, राजवीर विश्वास ढोबळे. पोत्यातील उड्यांच्या स्पर्धेत मुलांमध्ये आदर्श विकास पांढरे, समर्थ दत्ता कोकरे, राज बालाजी सुरवसे, मुलींमध्ये पूनम काकासाहेब नारे, गायत्री रामराजे गाढवे, कल्याणी सोमनाथ सौदागर.
तर लंगडी स्पर्धेत इयत्ता दुसरीतील मुला-मुलींनी विजय मिळवला. मुलींमधून जाधव अमृता, लकडे जान्हवी, देशमुख ईश्वरी, देवकते नंदीनी, कोळपे संस्कृती, झिंजे आदिती, भोंडवे ईश्वरी, कोकरे ज्ञानेश्वरी, ढोबळे स्वप्नाली, हजारे पूजा, मुलांमध्ये सिध्दांत सैलानी, कोकरे वीर, माने हरिओम, गायके कार्तिक, ढोबळे अक्षद, देवकते रविराज, समर्थ आगलावे, मळगे प्रतीक, ढोबळे श्रेयस, कदम गजानन आदी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
याप्रसंगी मुख्याध्यापक गणपती यरकळ, गोरोबा पाडुळे, सुभाष कुलकर्णी, बापू नाईकवाडी, सुमेध वाघमारे, नरहरी बडवे, हरी खोटे, सागर ढोणे, विकास भोरे, विजय कानाडे, गणेश साखरे, गोरख माळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. वर्षा शेजाळ, गोरख चौरे, उषा नाईक, प्रभावती मुंडे, रोहिणी हलसीकर, बंडगर लता, पांचाळ शकुंतला, क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे, चंद्रकांत गिरे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.