आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवार दि ६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका उषा उंबरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना सोशल मिडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा.पं. सदस्य किसन देडे, अनिल देडे, बबन सोनवणे, अमोल भिसे, मुख्याध्यापक उषा उंबरे, माया पवार, जयश्री चव्हाण, वर्षा पाठक, दिपाली परदेशी ,संजीवनी सरवदे अश्विनी जोगदंड, जगन्नाथ वाघे, छगन जगदाळे, अनिल दहीहांडे आणि उमेश सुर्वे उपस्थित होते.
काक्रंबा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल देडे यांनी मुलीच्या वाढदिवस साजरा न करता अनावश्यक खर्च टाळून महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.