आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक बांधिलकी:गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

तामलवाडी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शिवरत्न प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे मिडिया सेल तालुका अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांच्या वतीने रविवार दिनांक दि. ७ रोजी तामलवाडी येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. जीवनामध्ये यशस्वी बनायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याचे सचिन शिंदे यांनी सांगितले.

यावेळी चौडप्पा मसुते, अप्पुराजे भोसले, हणमंत गवळी, पांडुरंग म्हेत्रे,दगडु भाकरे, सुधीर पाटील, निलेश चिवरे, निरंजन करंडे, शशिकांत गायकवाड, सचिन शिंदे,राम कांबळे,विनायक पाटील, नागेश शिंदे, नागेश घोटकर ,बाळु भोसले, रामदास गायकवाड, तुकाराम गायकवाड, अलिम पिरजादे, गुलाब शेख,आदी मित्र परिवार विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...