आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामलवाडी:जिल्ह्यातील शाळांना शालेय साहित्याचे वितरण

तामलवाडी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या तामलवाडी येथील बालाजी अमाइन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांना विविध शालेय उपयोगी साहित्याचे व आरोग्य विभागास ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर उपकरणाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बालाजी अमाइन्स येथे बुधवार दि.२२ रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता हे होते. यावेळी बालाजीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, राजेश्वर रेडी, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरवणे व साहित्याचे वितरण बालाजी अमाईन्स कडून केले जाते.

याप्रसंगी जिल्ह्यातील बारा शाळांना स्मार्ट बोर्ड, संगणक ,प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही , प्रयोगशाळा उपकरणे, बेंचेस यांचे वाटप झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी सीएसआर मार्फत करत असलेल्या कामाचे कौतुक केले. त्याबरोबर कोरोना महामारीच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात बालाजी समूहाने केलेली मदत उल्लेखनिय होती असे सांगून परिसरातील तरुणांनी उद्योगाकडे करिअर म्हणून पहावे असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...