आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याचे वाटप:ऊसतोड कामगारांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप

कुरुल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामती परिसरातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यात १९ खडी मी वाचणारच, इंग्रजी मी वाचणारच या उजळणींसोबत वह्या, पेन हे साहित्य मोफत वाटप करण्यात आले. यशोदा सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने याचे आयोजन केले होते. यावेळी हराळवाडीतील जिल्हा परिषद शाळेत ऊसतोड कामगारांच्या मुलांना येण्यास प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमास उपविभागीय अभियंता रघुनाथ गायकवाड, कामती आरोग्य केंद्राचे प्रमुख डाॅ. एम. एम. हरकुड, मुख्याध्यापक चांगदेव पवार, उद्योजक नवनाथ तोरणे, उद्योजिका आश्विनी तोरणे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...