आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसओ मानांकन प्राप्त:कोरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बूट व सॉक्सचे वाटप

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात आयएसओ मानांकन प्राप्त कोरेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे रोटरी क्लब व लोकसहभागातून संकलित निधीतून सर्वच विद्यार्थ्यांना बुट व सॉक्सचे वाटप करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वजित खटके, माजी अध्यक्ष मनोहर बंडगर, सारिकाताई वाघमोडे, मुख्याद्यापक प्रवीण स्वामी यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब, ग्रामपंचायत व दानशूर पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या बुट सॉक्स साठी रक्कम जमा करण्यात आली होती. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक स्वामी यांनी रोटरी, सर्व दानशूरांचे आभार मानले.

यावेळी सहशिक्षक अशोक बिराजदार, उमाचंद्र सूर्यवंशी, लक्ष्मी वाघमारे यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना सर्वांनाच पोशाखाची शिस्त यावी तसेच शिस्तीचे महत्व शालेय जीवनापासूनच पटावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...