आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उभारी:सव्वाचारशे विधवा महिला शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर बियाण्यांच्या बॅगचे वाटप; संस्थेच्या माध्यमातून मदत

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी आणि कळंब तालुक्यातील ४२५ विधवा महिला शेतकऱ्यांना प्रत्येकी एक सोयाबीन व तूर बियाण्यांच्या बॅगचे वाटप करण्यात आले. पर्याय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फिनोलेक्स पाइप्स व मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळंबचे प्रभारी तहसीलदार मुस्तफा खोंदे, २१ शुगर्स लिमिटेड लातूर युनिटचे विजयकुमार देशमुख, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष प्रवीण पाटील, आमदार धीरज देशमुख यांचे स्वीय सहायक प्रकाश फंड, मुकुल माधव फाउंडेशन पुणेचे व्यवस्थापक बबलू मोकळे, मितेश श्रीगिरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ तोडकर होते. सूत्रसंचालन अनिक फायनान्सचे ऑपरेशन हेड विलास गोडगे यांनी तर आभार फिनोलेक्स कंपनीचे विक्री व सेवा प्रतिनिधी अमोल ठाकरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्याय संस्था एकल महिला संघटनेच्या सुनंदा खराटे यांच्यासह अनिक फायनान्स व पर्याय सामाजिक संस्था परिवारातील कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास हातभार लागणार आहे.

उद्योग, व्यवसायाचे प्रशिक्षण
महिलांना निरोगी शाश्वत वातावरण आणि पूर्ण रोजगार मिळण्यासाठी सक्षम करणे, उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण, महिला उद्योजक वाढवणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण घेण्यात आले आहेत. मागील चार वर्षांपासून दरवर्षी खरीप पेरणीच्या वेळी विधवा महिला शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर बियाणे ‌वाटपाचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...