आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्यांपासून सुरू केलेले वसुलीसाठीचे बैठा सत्याग्रह आंदोलन सोमवारीही (दि. २०) सुरूच होते. यादिवशी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी २७ ठिकाणी बैठा सत्याग्रह करून २४ थकबाकीदारांकडून एक कोटी २७ लाख ६५ हजार रुपयांची वसूली केली. गेल्या अनेक दिवसांपासून सत्याग्रह करूनही भाजप नेते विजय दंडनाईक थकबाकी भरत नसल्यामुळे थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
जिल्हा बँकेचे थकबाकीदारांकडे सुमारे २०० कोटी रुपये थकल्यामुळे जिल्हाभर सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये अनेक ठिकाणी यशही मिळत आहे. सोमवारीही असे जिल्ह्यातील २७ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले व सध्या भाजपमध्ये गेलेले विजय दंडनाईक यांच्या घरासमोर बँकेचे पथक गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. यामुळे सोमवारपासून आता त्यांच्या घरासमोर थाळी बजाओ आंदोलन करण्यात येत आहे. सोमवारीही पथकाला वसूलीला प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान जिल्ह्यात २७ पैकी २४ ठिकाणी आंदोलनाचा यश मिळाले आहे.
थकबाकीदारांनी चार हजार ते दिड लाखांपर्यंत थकबाकीची रक्कम भरली. एकूण एक कोटी २७ लाख ६५ हजार रुपयांची वसूली करण्यात आली. यापुढे आणखी आंदोलन सुरूच राहिल. तसेच विजय दंडनाईक थकबाकी भरणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरासमोर आंदोलन करून टप्प्याने त्याची तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचेही कार्यकारी संचालक विजय घोणसे पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.