आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद जिल्हा रुग्णालय अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग आणि आरोग्य विभागाच्या समित्यांची बैठक जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली.
जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गिताना संजय गांधी निराधार योजना, अन्त्योदय योजना, बालसंगोपन योजना, प्रधानमंत्री विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, एआरटी औषधी घेण्यासाठी मोफत बस पास सुविधा आदी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागास जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी आदेश दिले.
या बैठकीमध्ये जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफिक अन्सारी, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ.मिटकरी, सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, एआरटी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.निता पौळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एनएचएम डॉ.किरण गरड, जिल्हा पर्यवेक्षक आयसीटीसी महादेव शिनगारे तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी आदींची उपस्थिती होती. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचा आढावा पुढीलप्रमाणे सादर करण्यात आला.
जिल्ह्यातील एचआयव्ही समुपदेशन आणि चाचणी केंद्र ९२ कार्यरत असून या सर्व केंद्रावर एचआयव्ही चाचणी मोफत सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले. एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तीकरिता मोफत एआरटी औषधी केंद्र २ असून येथे एकूण ४४४५ रुग्णांवर मोफत औषध उपचार सुरु आहेत. माहे एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंतचे सामान्य गटांकरिता देण्यात आलेले एचआयव्ही चाचणीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य झाले आणि गरोदर मातेचे एचआयव्ही चाचणीचे ११४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले असून सामान्य गटात एकूण १६१ तर गरोदर माता ७ एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना मोफत एआरटी औषधी सुरु करण्यात आले आहेत.
या वर्षी एचआयव्ही संसर्गित ७ गरोदर मातांची जन्माला आलेले७ मुले तपासणी अंती एचआयव्ही संसर्ग मुक्त असल्याचे सांगितले आहे. एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांच्या बालकांना पॉझिटीव्ह होण्यापासून प्रतिबंध करण्यात यश आल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी उद्धव कदम यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गावर एचआयव्ही एड्स टोल फ्री नंबर १०९७ प्रदर्शित करणे तसेच एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व गावांमध्ये गाव तिथे एचआयव्ही चाचणी मोहीम राबवून पुढील तीन वर्षात टप्या टप्याने पूर्ण करणे आहे.आजपर्यंत ६९६१ इतक्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनेंचा लाभ मिळून देण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.