आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:जिल्हा पत्रकार संघातर्फे आज‎ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार‎

उस्मानाबाद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दर्पण दिनाचे औचित्य साधून‎ उस्मानाबाद जिल्हा पत्रकार‎ संघातर्फे शुक्रवारी (दि. ६) वृत्तपत्र‎ विक्रेते तसेच विविध क्षेत्रातील‎ उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्यांचा‎ तसेच पत्रकारांच्या पाल्यांचा‎ करण्यात येणार आहे.‎ पोलिस अधीक्षक अतुल‎ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत‎ हा कौतुक सोहळा शासकीय‎ विश्रामगृहात रंगणार आहे. शुक्रवारी‎ दुपारी १ वाजता हा कार्यक्रम होणार‎ आहे.

यात प्रामुख्याने वृत्तपत्र‎ विक्रेते, शहरातील सर्व पत्रकारांचा,‎ पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा,‎ उत्कृष्ट कार्याबद्दल कुटुंबातील‎ सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात‎ येणार आहे. यासोबतच आपापल्या‎ क्षेत्रात उल्‍लेखनीय काम केलेल्या‎ कलाकारांचाही सन्मान केला‎ जाणार आहे. यात प्रभाकर जगदाळे,‎ बाळासाहेब गोरे, भारुडकार कृष्णाई‎ उळेकर आदींचा यात समावेश‎ आहे.

यास उपस्थित राहण्याचे‎ आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष‎ चंद्रसेन देशमुख, सचिव भीमाशंकर‎ वाघमारे यांच्यासह जी. बी. राजपूत,‎ बालाजी निरफळ, सयाजी शेळके,‎ अमोल गाडे, विकास सुर्डी, मच्छिंद्र‎ कदम, बाबुराव चव्हाण, राकेश‎ कुलकर्णी, कालिदास म्हेत्रे, देविदास‎ पाठक, अनंत आडसूळ, कमलाकर‎ कुलकर्णी, महेश पोतदार, रवींद्र‎ केसकर, बाळासाहेब मुंदडा, संजय‎ जहागिरदार, दिलीप पाठक नारीकर‎ आदींनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...