आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हास्तरिय बैठक; आगामी निवडणुका रासप स्वबळावर लढणार

भूमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हास्तरिय बैठक सोमवार, दि. २० रोजी जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक डॉ. शिवाजी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहामध्ये पार पाडली. पक्षाने जिल्हाभरात संघटना वाढीसाठी प्रयत्न चालू केले असून, संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात नुकत्याच नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढणार असून यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी चालू केली आसल्याचे पक्ष निरीक्षक डॉ.शिवाजी शेंडगे यांनी बैठकीत सांगितले.

त्याच बरोबर जिल्ह्यात पक्ष संघटना बांधणीसाठी जोरदार प्रयत्न करणार असून यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठकीचे आयोजन कऱण्यात आले होते. या बैठकीत व गाव तिथे शाखा काढण्याची संकल्पना मांडण्यात आली. अशा अनेक विषयावर चर्चा या बैठकीला करण्यात आली. या बैठकीला रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड. विकास पाटील, मराठवाडा संघटक रघुनाथ वाघमोडे, नानासाहेब मदने, पंडितजी मारकड,जावेद शेख, भूम शहराध्यक्ष पठाण, भूम तालुका अध्यक्ष गजानन सोलंकर, परंडा तालुका उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख, हनुमंत वनवे, बंडू लोखंडे,संतोष हराळ, श्याम हराळ,तानाजी महानवर उपस्थित होते.