आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक‎:जिल्हा स्काउट गाइड‎ मेळावा, कोंबडवाडीचे यश‎

धाराशिव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ भारत स्काउट गाइड कार्यालयाच्या‎ वतीने कब बुलबुल स्काउट गाइड‎ मेळाव्यात धाराशिव तालुक्यातील‎ कोंबडवाडी येथील जिल्हा परिषद‎ प्राथमिक शाळेतील संघाने उत्कृष्ट‎ यश मिळवले.‎ मेळावा नुकताच धाराशिव येथे पार‎ पडला. यामध्ये कोंबडवाडी‎ शाळेतील १२ विद्यार्थी कबमास्टर‎ राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त‎ शिक्षक दिलीप चौधरी यांच्या‎ मार्गदर्शनाखाली सहभागी झाले‎ होते.

संघाने लोकनृत्यात प्रथम,‎ संचलनात द्वितीय, शेकोटी‎ कार्यक्रमात द्वितीय आणि‎ शोभायात्रेत द्वितीय असे क्रमांक व‎ ट्रॉफी मिळवली. याबद्दल शाळा‎ व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग‎ मिसाळ, मुख्याध्यापक शिवाजी‎ वाघ, दत्तात्रय हाजगुडे, उत्तम शेंडगे‎ आणि स्वाती बनसोडे यांनी कौतुक‎ केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...