आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्यस्तरीय अॅथलेटिक्ससाठी जिल्हा संघ जाहीर

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभम, प्रणिता, सोनाली, अखिल जाधव, योगिनी यांची निवड

पुणे येथे २१ ते २३ एप्रिल दरम्यान होत असलेल्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याचा संघ जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत जगताप, सचिव योगेश थोरबोले व तांत्रिक समिती प्रमुख संजय कोथळीकर यांनी जाहीर केला आहे. उस्मानाबाद येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे २७ ते २८ मार्चदरम्यान झालेल्या जिल्हास्तरीय वरिष्ठ गट अॅथलेटिक्स स्पर्धा व निवड चाचणीतून हा संघ जाहीर केला आहे.

उस्मानाबाद जिल्हा संघात १०० मी धावणे मुलात सुमित कदम, देव कांबळे, मुलीमध्ये - शुभांगी मते, अंजली भोसले, २०० मी धावणे मुलीत - ऐश्वर्या करदुस,संध्या क्षीरसागर, निकिता वायकर, ४०० मी धावणे - विशाल जाधवर, प्रथमेश चव्हाण, निकिता गायकवाड व पल्लवी साळवे, ८०० मी धावणे - अखिल जाधव, मीट रेकॉर्ड मध्ये श्रीराम पाडुळे, दीक्षित रिटे, बालिका चव्हाण, १५०० मी धावणे - अखिल जाधव, रितेश धोत्रे, लक्ष्मी गुंजोटे, ५००० मी धावणे - तानाजी लेंडवे, अजय वडवले, योगिनी साळुंके, गुजोटे लक्ष्मी, १०००० मी धावणे - योगिनी साळुंके, मीट रेकॉर्ड - ऐश्वर्या भोंडवे, महादेव पेठे, १०० H-प्रणिता जाधवर, भाला फेक-सोनाली पवार, मीट रेकॉर्ड राधा गोरे, विवेकानंद तुपे, अक्षय गरड, थाळी फेक- शीतल पवार

कोरोना कमी झाल्याने खेळाडूंना दिलासा
पुण्यामध्ये २१ ते २३ एप्रिलदरम्यान या स्पर्धा होत आहेत. यामध्ये निवड होण्यासाठी जिल्ह्यातील पुरुष तसेच महिला खेळाडूंनी बराच सराव केला. यशस्वी खेळाडूंचे प्रशिक्षकांनी अभिनंदन केले आहे. कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धा थांबल्या होत्या. लॉकडाऊनमुळेही जाहीर केलेल्या अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या. आता कोरोनाचे संकट टळले नसले तरी सरकारच्या वतीने निर्बंध शिथिल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे खेळाडूंना व स्पर्धा संयोजकांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...