आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांघिक क्रीडा प्रकार:विभागीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा कोषागार कार्यालय द्वितीय

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संचालनालय लेखा व कोषागार कर्मचारी कल्याण समितीद्वारे परभणी येथे आयोजित विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा कोषागार कार्यालयाने विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सर्व खेळाडूंचे जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे यांनी अभिनंदन केले.

सांघिक क्रीडा प्रकारातील खो-खो (महिला) प्रथम क्रमांक आणि थ्रो-बॉल (महिला) मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. गोळाफेक (पुरुष) मध्ये आकाश भोपळे, लांब उडी (महिला) मध्ये प्रज्ञा साळवे, टेबल टेनिस दुहेरी (महिला) मध्ये पूजा दळवे आणि अर्चना म्हेत्रे आदींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

टेबल टेनिस एकेरी (महिला) मध्ये पूजा दळवे, बॅडमिंटन दुहेरी (पुरुष) मध्ये बसवेश्वर वाळके आणि शुभम पाटील, टेबल टेनिस दुहेरी (पुरुष) मध्ये निलेश बारकुल आणि रामकृष्ण डंके, टेबल टेनिस एकेरी (पुरुष) मध्ये निलेश बारकुल, थाळीफेक (महिला) मध्ये प्रज्ञा साळवे, पाच किमी चालणे (पुरुष) मध्ये काजळे, तीन किमी चालणे (महिला) मध्ये सूर्यवंशी आणि कॅरम दुहेरी (पुरुष) मध्ये भगत आणि पवार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. रिले (महिला) मध्ये दळवे, हुलसूरकर, बडगुजर आणि नरवडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.

बातम्या आणखी आहेत...