आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:दिव्यांग अपंग उद्योग समूह  महामोर्चात सहभागी होणार ; तानाजी घोडके यांचा निर्णय

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दिव्यांग अपंग उद्योग समूहाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा आरक्षण महामोर्चात सहभागी होणार असल्याचे पत्र देण्यात आले.परंडा शहरात ८ नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या आरक्षण महामोर्चास दिव्यांग बांधव सहभागी होऊन मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाज बांधवांच्या वतीने महामोर्चात करणार आहेत.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दिव्यांग अपंग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी दिव्यांग बांधवांची बैठक घेऊन सर्वानुमते मराठा आरक्षण महामोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

याबाबतचे पत्र सकल मराठा समितीच्या पदाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.दिलेल्या पत्रावर दिव्यांग उद्योग समूहाचे शहराध्यक्ष गोरख देशमाने, तालुकाध्यक्ष पांडुरंग मिसाळ , सचिव पांडुरंग चोबे, प्रकाश काशीद ,महेश देशमुख ,गणेश जाधव नासिर शेख ,धनाजी खोसे, संतोष कुलकर्णी आदीसह दिव्यांग बांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...