आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप:दिव्यांग, निराधार, महिला प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समिती सभागृहामध्ये जिल्हा उद्योग केंद्र व मराठवाडा अपंग विकास मंडळाचे संयुक्त विद्यमाने अपंग दिव्यांग निराधार परित्यक्त्या व विधवा महिलांना स्वावलंबी करता यावे या हेतूने तीन दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप नुकताच झाला.

या तीन दिवसाच्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये भूम तालुक्यातील जवळपास ६० निराधार परित्यक्त्या, विधवा, दिव्यांग महिलांनी सहभाग घेतला होता.प्रशिक्षण घेण्यासाठी तज्ञ व्यवसायिक तज्ञ आधिकारी पांडुरंग मोरे ,चंद्रकांत नलवडे , उद्योग केंद्राचे दत्ता , निरीक्षक दत्तात्रय सुरवसे , विधिज्ञ व्याख्यात्या शुभांगी कुंभार यांनी व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी व्यवसायातले बारकावे कथन केले. या तीन दिवशीय कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा अपंग विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ लोखंडे, सचिव अर्जुन वायकर, सुवर्णा गायकवाड , जाधव गणेगाव , अरुण सोनटक्के , अंकुश शेवाळे , मराठवाडा अपंग विकास मंडळाचे वाशी तालुका अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले तर कार्यशाळेचे सूत्रसंचालन शंकर खामकर यांनी केले .

बातम्या आणखी आहेत...