आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किर्तन सेवा:संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन कल्याण करून घ्यावे; संजयानंद महाराज झानपुरे कीर्तनात आवाहन

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संताच्या चरणांवरती नतमस्तक होऊन आपल्या जीवनाचे कल्याण करून घेतले पाहिजे, असे अवाहन हभप संजयानंद महाराज झानपुरे यांनी श्री. हंसराज स्वामी महाराज यांच्या पुण्यातिथी उत्सवानिमित्त सोमवार (दि.१०) आयोजित कीर्तनाद्वारे केले.

शहरातील हंसराज स्वामी यांच्या मठात श्री.हंसराज स्वामी यांच्या १७२ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सोमवारी पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्यदिनी श्रींच्या समाधीस पहाटे ५ वाजता महारुद्र अभिषेक घातला व दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आला.रात्री ९ ते १०.३० संजयानंद महाराज झानपुरे यांची किर्तनसेवा संपन्न झाली.यावेळी हंस मंडळाचे ॲड.नितीन माढेकर, ॲड.सुनिल काळे, हरिभाऊ जोशी आदीसह हभप बालाजी महाराज बोराडे ॲड. श्रीकांत भालेराव, नगरसेवक मकरंद जोशी, श्रीनिवास खर्डेकर, शाम कुलकर्णी बाळासाहेब जकातदार, अनंत केसकर, अमोल जोशी, अमोल वांभुरकर आदीसह परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.

हभप झानपुरे महाराज पुढे म्हणाले की, मनुष्य जीवन हे भगवंत प्राप्तीसाठी मिळाले असून त्यासाठी मनुष्याने प्रयत्न केले पाहिजेत व आपला उद्धार कशाने होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. भगवदगीतेतही याचाच उल्लेख आहे. माणसाने स्वत:चा उद्धार स्वत:च करावा असे सांगितले गेले आहे.

इतर प्राण्यापेक्षा मनुष्याला बुद्धी नावाची गोष्ट जास्त दिली आहे. प्राण्यंाना हे समजत नाही. पण मनुष्याने याचा उपयोग करून घेतला पाहिजे. ही गोष्ट सुखी जीवनासाठी महत्वाची आहे. संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या जिवानाचं कल्याण करून घेतले पाहिजे. संतच मानवी जीवनाचे कल्याण करु शकतात. कारण संताच्या जवळ पुण्याचा साठा भरपूर असल्याने ते सर्व सामान्य जिवाचा उद्धार करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...