आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारी‎:डॉक्टरांवर आता आरोग्य सेवेसोबत‎ स्वच्छतेचीही असणार जबाबदारी‎

कळंब‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिन्याच्या पहिल्या शनिवारी सर्व‎ शासकीय आरोग्य संस्थेत स्वच्छता‎ दिवस राबवण्यात येणार असून आता‎ डॉक्टरांना आरोग्य सेवेसोबत‎ स्वच्छतेची जवाबदारी पार पाडावी‎ लागणार आहे.‎ शासकीय रुग्णालये, प्राथमिक‎ आरोग्य केंद्रात स्वच्छता दिवस‎ पाळण्यात येणार आहे. यामध्ये परिसर,‎ आंतररुग्ण विभाग, स्वच्छतागृहे,‎ बालरुग्ण विभाग, भांडार विभाग,‎ इत्यादीची स्वच्छता करण्यात यावी.‎

र्निलेखनासाठीचे साहित्य वेगळया‎ ठिकाणी लावण्यात यावे, कॉरीडोर,‎ वॉर्ड, शल्यचिकित्सालय, स्वच्छतागृह‎ येथे कोणतीही अडगळीची वस्तू‎ राहणार नाही याची दक्षता घ्यावी, सर्व‎ कर्मचारी व अधिकारी या स्वच्छता‎ अभियानात सहभागी राहतील याची‎ दक्षता घ्यावी, अशा सूचना आरोग्य‎ विभागाच्या आयुक्तांनी दिल्या आहेत.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या या‎ उपक्रमातून परिसरात साफसफाई‎ करण्यात आली आहे. वैद्यकीय‎ अधिकक्ष डॉ. मंजुराणी शेळके यांच्या‎ मार्गदर्शनाखाली डॉ. पुरुषोत्तम‎ पाटील, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. शरद‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दशरथ, डॉ. मिरा दशरथ,डॉ.‎ बालाजी आदमपुरकर, कर्मचारी‎ इश्वर भोसले, परशुराम कोळी,‎ परिचारिका मीरा राऊत, संगिता‎ ठोंबरे, संगीता बनकर यांनी‎ परिसराची स्वच्छता केली.‎

बातम्या आणखी आहेत...