आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:डॉजबॉल संघाची विभागीय स्तरावर धडक

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आदर्श विद्यालयाच्या संघाचे जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या कामगिरीबद्दल संघ, मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तेरणा हायस्कूल उस्मानाबाद येथे जिल्हा क्रीडा शिक्षण विभागाच्या ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातून जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत आदर्श विद्यालयाच्या संघाने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या संघाची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.

तसेच मुलींच्या संघानेही जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीसाठी यशस्वी खेळाडू आदित्य बडे, प्रकाश मेलगीरे, सुजित कोराळे, कुणाल डावरे, सुयश बिराजदार, सौरभ पाटील, प्रणव सनातन, अजित चव्हाण, आदित्य मारेकर, ऋषिकेश शिंदे आणि मार्गदर्शक शिक्षक शिवराज सुरवसे, सुनिता बारसकर यांचा श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सरचिटणीस बसवराज पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, सदस्य शिवमूर्ती भांडेकर, भाऊराव सोमवंशी, मल्लिनाथ दंडगे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड आदींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या वतीने विजयी संघातील खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचा प्राचार्य सोमशंकर महाजन, पर्यवेक्षक बी. एम. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...