आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:घरगुती 50 तर व्यावसायिक सिलिंडर 102 रुपये महाग; 14 किलो सिलिंडर 1024 रुपये तर 19 किलो सिलिंडर 2433 रुपयांवर, हॉटेलिंगला बसणार ब्रेक

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल व इतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असताना स्वयंपाकाच्या गॅसचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडर १०२ रुपयांनी महागले आहे. त्यांचे दर अनुक्रमे १०२४ व २४३३ रुपयांवर पोहोचले आहे. याचा सर्वसामान्य कुटुंबांना सर्वाधिक फटका बसला आहे. हॉटेल व्यावसायिकांनाही झळ बसत असून ते दर वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत एप्रिलमध्ये ९७४.५ तर व्यावसायिक सिलिंडरचे दर २,३३१ रुपये होते. मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर १०२४.५ रुपये तर व्यावसायीक गॅस सिलिंडर २४३३.५ रुपयांवर पोहोचले आहे. घरगुती गॅस सिलिंडरमध्ये दोन महिन्यात १०० रुपयांची वाढ झाली. मार्चमध्ये १४ किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी ९२४.५ रुपये मोजावे लागत होते तर एप्रिलमध्ये ९७४.५ रुपये आणि मे महिन्यात १०२४.५ रुपये किंमत झाली.

तर व्यावसायिक सिलिंडरमध्ये दोन महिन्यात ३५२ रुपयांची वाढ झाली. मार्चमध्ये १९ किलोच्या सिलिंडरसाठी २०७९ रुपये लागत होते. यामध्ये ३५४ रुपयांची वाढ होऊन आता मे महिन्यात प्रति सिलिंडरसाठी २४३३.५ रुपये खर्च करावे लागत आहे. दुसरीकडे या सिलिंडरवर मिळणारी सबसिडी मात्र दिवसेंदिवस कमी होत असून, आता केवळ ३ ते ४ रुपयांपर्यंत सबसिडी मिळते.

बातम्या आणखी आहेत...