आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजप गटाचे वर्चस्व, जिल्ह्यात इतर गटांचाही प्रभाव

उस्मानाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपने आपले वर्चस्व राखले आहेत. तसेच इतर ग्रामपंचायतीत तिथल्या गटांचाही प्रभाव कायम असल्याने त्यांनी यात बाजी मारल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी संबंधीत तालुक्यातील तहसील कार्यालयात साडेदहा वाजता मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर निकाल घोषित करण्यात आले.

उमरग्यात पाचपैकी एक ग्रापं.अविरोध

उमरगा तालुक्यात पाच पैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाली असून चार ग्रामपंचायतीच्या ३२ सदस्य निवडीसाठी ७० उमेदवार रिंगणात होते. यात ७५.११ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीत तुगाव, कसगी, कोरेगाववाडी ग्रामपंचायतीत शिवसेना व शिवसेना-भाजप पुरस्कृत आघाडीने विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. तुगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक सुभाष चव्हाण, समाबाई चव्हाण, अंबुबाई दूधभाते, प्रभाग दोन मोहन शिंदे, व्यंकट कांबळे व शामल चव्हाण, प्रभाग तीन गीता माने, रेहनाबी जमादार व दीपक जोमदे, प्रभाग चार गणेश माने, आशाबाई माने तर प्रभाग पाच सुमिता शिंदे, संजय बिराजदार हे १३ सदस्य विजयी झाले. कसगी ग्रामपंचायत प्रभाग एक मल्लिनाथ बोरूटे, सावित्री पुजारी, शारदाबाई अलगुडे, प्रभाग दोन नागराबाई गावडे, चंद्रकला मुलगे, धनराज जगदाळे, प्रभाग तीनमध्ये शिवाजी यमगर, सविता माशाळे (बिनविरोध), प्रभाग चार हणमंत गुरव, राणी कोळी. प्रभाग पाच सायबा सोनकांबळे, उस्मान मुल्ला, शुभांगी गायकवाड (बिनविरोध) ११ सदस्य विजयी झाले. कोरेगाववाडी ग्रामपंचायत एकूण नऊ जागेपैकी एक जागा रिक्त असून प्रभाग एक विजयकुमार पाटील, सुकुमार महानुर प्रभाग दोन व्यंकट माने, महानंदा महानुर, पार्वती करनुरे तर प्रभाग तीन अनंत लवटे, सुनीता बाचके, मुद्रिकाबाई शेंडगे हे आठ सदस्य विजयी झाले आहेत.

कोरेगाव ग्रामपंचायत च्या सात जागेपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या असून प्रभाग एक पांडुरंग खटके विजयी झाले असून गिरीजाबाई बंडगर, राजश्री सूर्यवंशी (बिनविरोध), प्रभाग दोन सुनीता इंगळे, गोपाळ मोरे (बिनविरोध), प्रभाग तीन उषा इंगळे व अलका सूर्यवंशी (बिनविरोध) झाले आहेत. तालुक्यातील अंबरनगर ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून बिनविरोध सदस्य प्रभाग एक किसन जाधव, सुहासिनी चव्हाण, धानू बाई जाधव. प्रभाग दोन घेनू पवार, शिवाजी पवार, कमल जाधव. प्रभाग तीन गोपाळ चव्हाण, सुरताबाई राठोड अन् अनिता राठोड एकूण नऊ सदस्य बिनविरोध आले आहेत. तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रतन काजळे, निवडणूक अधिकारी के बी भांगे, व्ही एस घुमे, एन आर पवार, बी सी रेड्डी, विकास स्वामी, संदीप सरपे यांनी परिश्रम घेत. चार ग्रामपंचायतच्या मतमोजणी दरम्यान पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जय हनुमान पॅनलला पुन्हा संधी
वाशी तालुक्यात सोनेगाव येथे सत्तेत संधी मिळालेल्या जय हनुमान पॅनलकडून राजेंद्र भानुदास सुकाळे हे सर्वसाधारण गटातून तर रघुनाथ गुलाब कांबळे अनुसूचित जाती मधून विजयी झाले. तर अंजू बिभीषण सुकाळे व राजुबाई राजेंद्र सुकाळे या दोन्ही महिला उमेदवारांना विरोधी गटाच्या उमेदवार एवढीच मते मिळाल्याने मतमोजणी प्रक्रियेमध्ये चिठ्ठी काढून विजय मिळाला. यामुळे विरोधी गटाचे दगडूबाई नागनाथ, उमा बाळासाहेब सुकाळे, विनोद राजेंद्र आकरे या तीनच उमेदवारांना विजय प्राप्त होऊन चार जागेवर विजय प्राप्त झालेल्या मागील वेळच्या गटाला पुन्हा सत्तेची संधी प्राप्त झाली आहे. विजयी गट हा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत चेडे यांचा समर्थक आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी तहसीलदार नरसिंग जाधव यांनी पड निर्देशित अधिकारी तर विस्तार अधिकारी प्रताप गलांडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

तुळजापूर तालुक्यात तहसीलदार सौदागर तांदळे यांचा दालनात मतमोजणी झाली. यात कामठा प्रभाग क्र.२ मधुन शैला संतोष क्षीरसागर यांची अनुसूचित जाती स्‍त्री प्रवर्गामधुन या पूर्वीच बिनविरोध घोषित केली. प्रभाग क्र. १ मध्ये शकुंतला शहाजी जमदाडे व लक्ष्मी सूशेन मस्के या दोघींना १६१ समान मते मिळाली. यावेळी चिठ्ठी काढण्यात आली. चिठ्ठीचा कौल शकुंतला शहाजी जमदाडे यांचा पारड्यात गेला. मत मोजणीसाठी सहायक म्हणून प्रा. व्‍ही. एस. गंगणे, प्रा. व्‍ही. डी. धनके, प्रा. गणेश मोटे यांनी काम पाहिले. यावेळी नायब तहसीलदार अमित भारती, निवडणूक कर्मचारी दत्ता नन्नवरे, परिचर प्रशांत मुलगे, सूर्यकांत पांढरे, बापू रणसुरे आदींनी सहाय्य केले. कामठा येथून अविनाश वसंत रोकडे, मंगल महादेव मस्के, शकुंतला शहाजी जमदाडे, शरीफ इलाही शेख, लक्ष्मी तुकाराम देशमुख, प्रशांत काशीनाथ रोकडे, योगेश मगन रोकडे व मनिषा रामचंद्र पटाडे. दिपक नगर ग्रामपंचायतीत राजेंद्र रामचंद्र राठोड, मुक्ताबाई मनोहर राठोड, सुवर्णा रामसिंग राठोड, गंगुबाई माणिक राठोड, बाळासाहेब गेना राठोड व चैत्राली तानाजी राठोड.

चिंचोली ग्रामपंचायत अविरोध
लोहारा तालुक्यात खेड ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक एक मधून राजश्री कांबळे, प्रभाग क्रमांक दोन मधून शरविन शेख, जया कांबळे तर प्रभाग क्रमांक चार मधून सोनाली कसकर, गिरीजाबाई बनसोडे ह्या विजयी झाल्या आहेत. मतमोजणी प्रक्रियेवेळी तहसीलदार संतोष रुईकर, निवडणूक निर्णय अधिकारी विनोद पवार, नायब तहसीलदार डी. पी. स्वामी, अव्वल कारकून बी. डी. चामे, लिपिक वजीर अत्तार आदींसह कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील चिंचोली (रेबे) ग्रामपंचायतीची ही पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. या ग्रामपंचायतीच्या एकूण ७ जागा आहेत. परंतु या ठिकाणची निवडणूक बिनविरोध पार पडली.

दाभा ग्रामपंचायतीवर ७ पैकी ६ जागा, भाजपचा दणदणीत विजय कळंब तालुक्यात तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील दाभा ग्रामपंचायतीवर सात पैकी सहा उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. विजयी उमेदवारांचा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. नवनिर्वाचित सदस्य अशोक शिवाजी टेळे, हेमा प्रकाश टेळे,साहेबराव रंगनाथ लोंढे, राजमती बब्रुवान जाधव, मनीषा अशोक साबळे, शशिकला तात्यासाहेब टेळे यांच्यासह पॅनलमधील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संदीप बावीकर, सुधीर बिक्कड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...