आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिराज्य:नगरपरिषदेच्या सर्वच वॉर्डांमध्ये महिलांचे अधिराज्य, आक्षेपांसाठी चार दिवस

उस्मानाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी प्रभागाची आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्यात आली. यात शहरातील २० प्रभागात २१ महिला नगरसेविकांना संधी मिळाली आहे. त्यात चार एससी आणि एस एसटी महिला सदस्यांना तर उर्वरित १६ महिला नगरसेविका सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणुक लढवू शकणार आहे. १५ जूनपासून २१ जूनपर्यंत त्यावर नागरिकांना आक्षेप नोंदवता येणार आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शहरात नव्याने प्रभागरचना केल्याने नगरसेवक संख्या वाढून प्रभागसंख्याही वाढली. नवीन पद्धतीनुसार आरक्षण सोडत काढण्यात आली. शुक्रवारी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीसाठी वेबसाइटवर नोटीस प्रसिद्ध केली होती. त्यानुसार सोमवारी तहसील भवनात दुपारी १२ वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या उपस्थितीत पूर्ण झाला. यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण त्या-त्या प्रभागासाठी लागू करण्यात आले. त्यामुळे प्रभाग रचना जशी नगरपरिषदेची अंतिम करण्यात आली होती. तशीच आरक्षण सोडतही कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.

नियमानुसार कामे केली आमच्या वतीने पारदर्शक आणि काटेकोर नियमांचे पालन करुन आरक्षण साेडत प्रक्रिया राबवली आहे. त्यावर नागरिकांना काही आक्षेप असल्यास त्यांना आक्षेप घेता येणार आहेत. त्यासाठी वेळ दिला आहे. नंतर मतदारयाद्यांचे कार्यक्रम सुरू होणार आहे. हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी नगरपरिषद.

प्र. क्र. आरक्षण प्रकार १ – अ सर्वसाधारण महिला १ - ब एससी सर्वसाधारण २- अ सर्वसाधारण महिला २ – ब सर्वसाधारण ३ – अ सर्वसाधारण महिला ३ – ब एससी सर्वसाधारण ४ – अ सर्वसाधारण महिला ४ – ब सर्वसाधारण ५ – अ सर्वसाधारण महिला ५ – ब सर्वसाधारण ६ – अ सर्वसाधारण महिला ६ – ब सर्वसाधारण ७ – अ एससी महिला ७ – ब सर्वसाधारण

प्र. क्र. आरक्षण प्रकार ८ – अ एससी महिला ८ – ब सर्वसाधारण ९ – अ सर्वसाधारण महिला ९ – ब सर्वसाधारण १० – अ सर्वसाधारण महिला १० – ब सर्वसाधारण ११ – अ सर्वसाधारण महिला ११ – ब सर्वसाधारण १२ – अ एसटी महिला १२ – ब सर्वसाधारण १३ – अ सर्वसाधारण महिला १३ – ब सर्वसाधारण १४ – अ एससी महिला १४ – ब सर्वसाधारण

प्र. क्र. आरक्षण प्रकार १५ – अ एससी महिला १५ – ब सर्वसाधारण १६ – अ सर्वसाधारण महिला १६ – ब सर्वसाधारण १७ – अ सर्वसाधारण महिला १७ – ब सर्वसाधारण १८ - अ सर्वसाधारण महिला १८ - ब सर्वसाधारण १९ – अ सर्वसाधारण महिला १९ – ब एससी सर्वसाधारण २० – अ सर्वसाधारण महिला २० – ब सर्वसाधारण महिला २० – क सर्वसाधारण (एकूण २० प्रभाग)

आरक्षण सोडतीचे वेळापत्रक १० जून- वेबसाइटवर सोडतीची नोटीस. १३ जून – आरक्षण सोडत काढणे. १५ जून – आक्षेप, हरकतींसाठी सोडत प्रसिद्ध करणे. १५ ते २१ जून: कालावधीत नागरिकांनी आरक्षण सोडतीवर आक्षेप घेणे. २४ जून – सोडतीचा अहवाल विभागीय आयुक्तांना देणे. २९ जून – विभागीय आयुक्तांकडून सोडतीस मान्यता. १ जुलै - अंतिम आरक्षण सोडतीची माहिती प्रसिद्ध करणे.

बातम्या आणखी आहेत...