आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसरपंच:डोंजा सरपंचपदी काळे तर उपसरपंच सूर्यवंशी

डोंजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील डोंजा येथील ग्रामपंचायतीवर रेणुका माता आघाडीचा विजय झाला असून सरपंचपदी अश्विनी काळे तर उपसरंपचपदी रणजीत सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली अाहे. दरम्यान ग्रामस्थांनी जल्लाेषात मिरवणूक काढली.

परंडा तालुक्यातील डोंजा येथील सरपंंच व उपसरपंच अपात्र ठरल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. सरपंच व उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (दि.७) डोंजा-बंगाळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी अरुण काळे यांची तर उपसरपंचपदी रणजीत आबासाहेब सूर्यवंशी यांची बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून मंडळाधिकारी एस. के. शेख, सुनिल पाटील, रामचंद्र घोगरे, धनंजय पाटील, ॲड. दत्तात्रय सूर्यवंशी, प्रकाश पाटील, धनंजय भागवत पाटील, सुधाकर भालेराव, नजीर शेख आदी उपस्थित होते. निवडीनंतर डोंजा व बंगाळवाडी ग्रामस्थांनी जल्लोषात मिरवणूक काढून आनंद साजरा केला. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...