आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीची बातमी:शेतकऱ्यांना भरपाईसाठी अनावश्यक कागदपत्रांची सक्ती करू नका ; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे मिळणाऱ्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना अनावश्यक कागपत्रांची सक्ती न करता अनुदान वाटप करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. भरपाई देण्यासाठी प्रशासनाकडून विहित नमुन्यात माहिती मागवण्यात येत आहे. त्यात शेतकऱ्यांचे आधार, मोबाइस क्रमांक मागवण्यात येत आहेत. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक थेट शेतकऱ्यांच्या दारात जात आहेत. परंतु, शेतकरी रब्बी पेरणी व सोयाबीन काढण्याच्या लगबगीत आहेत. यासंदर्भात “दिव्य मराठी’ने रविवारी “शेतकऱ्यांचे मदतीकडे डोळे, शासन -प्रशासन कागदपत्राच्या प्रक्रियेत दंग’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यावर पालकमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून सूचना दिल्या. कागदपत्र मागण्यासंदर्भात कोणत्याही सूचना शासनस्तरावरून देण्यात आलेल्या नाहीत, असेही पत्रात म्हटले आहे.

पालकमंत्री, उपआयुक्तांच्या पत्रात विरोधाभास पालकमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या रविवारच्या पत्रात यासंदर्भात शासन स्तरावरून अशा सूचना दिल्या नसल्याचे नमुद आहे.विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त पराग सोमन (महसूल) यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या उपसचिवांच्या दि. १९ व २१ ऑक्टोबरच्या पत्रांचाच संदर्भ देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असे पंचनामे विहित नमुण्यात सादर करून अभिलेखे अद्यावत करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता दोघांपैकी कोण खरे व खोटे, याची चर्चा सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...