आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील महात्मा बसवेश्वर विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनिल बटगिरे , कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास कुलकर्णी ,शाळेतील क्रिडा विभाग प्रमुख संजय कोथळीकर, प्रभारी मुख्याध्यापक शरद गायकवाड , माधव माने आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे सुनिल बटगिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
ज्ञानेश्वर विद्यालय,तुरोरी
तुरोरी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. प्राचार्य एन. एम. माने, उपमुख्याध्यापक बी. एस. जाधव , पर्यवेक्षिका एस. एम. आहिरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इतिहास शिक्षक नरहरी भोसले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ वर्षाच्या आयुष्यावर प्रकाश टाकला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेने सर्वांना समान अधिकार दिले असून तिचे पालन करावे असे आवाहन याप्रसंगी मान्यवरांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र मुगळे यांनी केले तर आभार एस. एस. सर्जे यांनी मानले.
भारत विद्यालयात प्रतिमेचे पूजन
शहरातील भारत विद्यालयात भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक तात्याराव मोरे यांच्या पुतळ्याचे पुजन प्रशालेचे मुख्याध्यापक शाहुराज जाधव सर यांच्या हस्ते झाले.यानंतर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमचे पूजन प्रशालेचे पर्यवेक्षक संजय देशमुख यांनी केले.या प्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक विक्रांत मोरे विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते.यावेळी सहशिक्षक व्यंकट गुंजोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास हा विविध क्षेत्रांसाठी प्रेरणादायी आहे असे सांगितले.
सामाजिक क्षेत्राबरोबरच, आर्थिक, शिक्षण, कायदा, पत्रकारिता, राजकारण,संस्कृती, तत्वज्ञान, परराष्ट्र संबंध, व्यवस्थापन आदी विविध क्षेत्रांत डॉ. आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेची छाप सोडली. शोषित-वंचितांचा आधार बनलेल्या डॉ. आंबेडकरांचे विचार जागतिक स्तरावर आजही विविध क्षेत्रांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहेत असे मत व्यंकट गुंजोटे यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.