आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथोर समाज सुधारकांचा वसा घेऊन जगणारे शिक्षणमहर्षी कै. सि. ना. आलुरे गुरुजींचे जीवन हे वाहत्या नदीप्रमाणे स्वछ होते, असे गौरवोद्गार सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी अशोक चिंचोले यांनी काढले. ते ‘गुरुजींचे सामाजिक व शैक्षणिक कार्य’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.
येथील जवाहर विद्यालयात शनिवारी (दि.३०) व्याख्यानात प्रथमतः आलुरे गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन शालेय समिती अध्यक्ष रामचंद्र आलुरे, डॉ. अशोक चिंचोले, मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे यांनी केले. चिंचोले म्हणाले, समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद याबद्दल गुरुजींना चीड होती. समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज, विनोबा भावे, साने गुरुजी, महात्मा गांधीजी, रामकृष्ण परमहंस, जगदाळे मामा यांचा वसा घेऊनच सामाजिक कार्य केले. आज गुरुजींचे अनेक विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड आदी देशात उद्योग व्यवसायात स्थिरावले. मराठवाड्यातील एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ, अणदूरला गुरूजींनी नावारूपास आणले. सामाजिक कार्यात गुरूजींनी गोर-गरीबांना वैयक्तिक आर्थिक मदत केली. त्यांचे कार्य अविस्मरणीय असल्याचे सांगून गुरुजींचे आयुष्य तेजोमय दिपस्तंभाप्रमाणेच असल्याचे स्पष्ट केले.
सविस्तर विवेचन
अध्यक्षीय समारोपात रामचंद्र आलुरे यांनी सविस्तर विवेचन केले. या व्याख्यानास पालक मल्लिनाथ लंगडे, भारत गायकवाड, बबन कंदले, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच आलुरे परिवारातील अनेकजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिंबाजी सुरवसे यांनी तर आभार उपमुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.