आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:डॉ. गिरीधर सोमवंशी यांचा जमाले पारितोषिकाने सन्मान

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील इतिहास विभागाचे विभागप्रमुख डॉ गिरीधर नागोराव सोमवंशी यांचे चिटणीसेतर बखर वाङ्मयामध्ये निर्माण केलेली संभाजीराजे यांची अनैतिहासिक प्रतिमा एक चिकित्सक अभ्यास, या शोध निबंधाला कै. नारायण गणपतराव जमाले पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.

शिरूर अनंतपाळ येथे शिवनेरी महाविद्यालयात मराठवाडा इतिहास परिषदेच्यावतीने तीन डिसेंबर रोजी आयोजित ४२ व्या राष्ट्रीय अधिवेशनात नारायण गणपतराव जमाले यांचे स्मरणार्थ डॉ सोमवंशी यांचे शोध निबंधाला मध्ययुगीन विभागातील उत्कृष्ट शोध निबंधसाठीचे पारितोषिक देण्यात आले.

राष्ट्रीय अधिवेशनात सोमनाथ रोडे, प्रभाकरराव कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ सोमवंशी यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. मराठवाडा इतिहास परिषद औरंगाबाद येथे ४१ व्या राष्ट्रीय अधिवेशन हे यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिल्लोड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात डॉ सोमवंशी यांनी हा शोध निबंध सादर केला होता.

बातम्या आणखी आहेत...