आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेचे उद्घाटन‎:रा.प.महाविद्यालयात डॉ. साळुंखे‎ मराठवाडा विभागीय स्पर्धेचे उद्घाटन‎

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था‎ कोल्हापूर संचलित रामकृष्ण‎ परमहंस महाविद्यालयात‎ शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे‎ मराठवाडा विभागीय स्पर्धेचे‎ उद्घाटन रामकृष्ण परमहंस‎ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा‎ मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य‎ डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते‎ झाले.‎ उद्घाटन प्रसंगी प्राचार्य‎ डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले‎ की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये पूर्ण‎ क्षमतेने उतरून यश संपादन करावे‎ आणि आपल्या शाळेचे नाव उज्वल‎ करावे.

यशस्वी विद्यार्थ्यांनी संयम‎ बाळगावा आणि जे यशापासून‎ वंचित राहिलेले आहेत अशा‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्पर्धकांनी खचून न जाता पुढील‎ शैक्षणिक वर्षातील स्पर्धेत पूर्ण‎ क्षमतेने सहभागी होऊन यश संपादन‎ करण्यासाठी प्रयत्न करावा. या‎ कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती‎ म्हणून सुशिलादेवी साळुंखे‎ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.‎ प्रकाश कांबळे होते.‎

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी‎ डॉ.बापूजी साळुंखे विधी‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. व्ही‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिंदे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक‎ डॉ.केशव क्षीरसागर यांनी केले‎ सूत्रसंचालन डॉ. शिवाजी‎ गायकवाड यांनी केले तर आभार‎ डॉ.वैभव आगळे यांनी मानले. सदर‎ स्पर्धेसाठी श्री स्वामी विवेकानंद‎ शिक्षण संस्थेच्या मराठवाडा‎ विभागातील सर्व शाखातील‎ विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्ते सहभागी‎ झाले होते. परीक्षांसाठी बसलेल्या‎ विद्यार्थ्यांना याचा फायदा होताे.‎

बातम्या आणखी आहेत...