आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:डॉ. सावंत यांच्याकडून महाआरोग्य शिबिराची स्थळ पाहणी करून आढावा

परंडा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पहिल्या महाआरोग्य शिबिराचे रविवारी (दि.२७) आयोजन करण्यात आले आहे. परंडा येथील कोटला मैदानावर हे शिबिर होणार असून डॉ. तानाजी सावंत यांनी पूर्वतयारीचा शिबिराच्या स्थळी भेट देऊन पाहणी करत आढावा घेतला. या महाआरोग्य शिबिरात विविध आजारांची तपासणी करुन उपचार करत औषधे दिली जाणार आहेत.

शिबिरात कॅन्सर, नेत्र, हृदयरोग, कान-नाक घसा, रक्त तपासणी, हाडांची तपासणी, इसीजी दंत तपासणी, रक्तगट तपासणी, चष्म्याचे वितरण, औषध वितरण व मोफत तपासणी करण्यात येणार आहे. शिबिराचा मतदारसंघातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. डॉ. सावंत यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कोटला मैदानाला भेट देत पाहणी केली. त्यांनी शिबिराच्या नियोजनाबाबत चर्चा करुन आवश्यक औषधी, २५० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक, आवश्यक मनुष्यबळ, १०० रुग्णवाहिका, पाण्याची सोय, २४ तास विजेची व्यवस्था, पोलिस व्यवस्थापन, शिबिराच्या ठिकाणची स्वच्छता, प्रसिद्धी साहित्य, इतर सोयीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

‘माता सुरक्षित...’ अभियानाची केंद्राकडून दखल
महाआरोग्य शिबिरातून महाराष्ट्रात पाच लाख लोकांची आरोग्य तपासणी करण्याचा मानस आहे. यासाठी गिनीज बुक मध्ये १० वेळा नाव आलेले डॉ. धमेंद्रा यांचे शिबिरासाठी सहकार्य लाभले आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणी झाली. केंद्र सरकारने या अभियानाची दखल घेतली असून संपूर्ण देशात हे अभियान राबवले जाणार आहे. - प्रा. डॉ. तानजी सावंत, सार्वजनिक आरोग्यमंत्री.

बातम्या आणखी आहेत...