आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:डॉ. श्रीगिरे दांपत्याचा समाजभूषण, कार्यगौरव पुरस्काराने गौरव

लोहारा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथे काव्य मित्र संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन, राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतिदिन व अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोहारा येथील डॉ. रूपाली हेमंत श्रीगिरे यांना राष्ट्रीय आदर्श महिला समाजभूषण पुरस्कार व डॉ. हेमंत श्रीगिरे यांना राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ऑटो क्लस्टर ऑडीटोरिअम, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. डॉ. श्रीगिरे दांपत्याने आजपर्यंत केलेल्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन डॉ. पंडित विद्यासागर (माजी कुलगुरू व ज्येष्ठ विचारवंत, पुणे), डॉ. जयश्री घोडके (नळदुर्ग), भाऊसाहेब जंजिरे (सेवाभावी उद्योजक पुणे), डॉ. वंदना वाहुळ ( शिक्षण उपसंचालक पुणे), रवींद्र साळुंके ( शिक्षण तज्ज्ञ पुणे) आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. रूपाली श्रीगिरे व डॉ. हेमंत श्रीगिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी निमंत्रक हरीनाथ कांबळे, मुख्य संयोजक राजेंद्र सगर व निवेदक संजय जगताप, कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...