आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार पावसाने हजेरी लावली:उस्मानाबादेत रिमझिम पाऊस;तुळजापुरात जोरदार सरी

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद शहरासह तुळजापूर शहर आणि परिसरात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी तासभर संततधार तसेच सायंकाळी जोरदार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे.गेल्या सहा दिवसांपासून थांबून राहिलेल्या पावसाने गुरुवारी पुन्हा जिल्ह्यात आगेकूच केली असून अनेक ठिकाणी बरसलाही. या वर्षी संपूर्ण जुलै महिन्यात लागून राहिलेल्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे.

सततच्या पावसाने वाढ खुंटून उत्पादनात घट झाली आहे. त्यातच काढणीच्या तोंडावर पावसाने हजेरी लावल्याने नुकसानीत भर पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस उस्मानाबाद शहरात दुपारनंतर काही वेळ रिमझिम बरसला. आलेल्या ढगांमुळे मोठा पाऊस येण्याची स्थिती निर्माण झाली होती. तसेच तुळजापुरात सकाळी संततधार पाऊस झाला. दिवसभर उघडीप दिलेला पाऊस सायंकाळी पुन्हा मुसळधार कोसळला.

बातम्या आणखी आहेत...