आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांवर संकट:जिल्ह्यात धुवाधार बरसात; परंड्यातील आसूमध्ये अतिवृष्टी

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१५ दिवसांहून अधिक काळ पाठ फिरविलेल्या पावसाचे पुनरागमन झाले असून, बुधवारी रात्री तसेच गुरूवारी दुपारनंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. गुरूवारी पहाटेपर्यंतच्या नोंदीनुसार परंडा तालुक्यातील आसू मंडळामध्ये ७८.३ मिलिमिटर (अतिवृष्टी) पाऊस झाला.तर परंड्यातील जवळा, अनाळा मंडळातही जोरदार पाऊस झाला. उस्मानाबादेत गुरूवारी सायंकाळी पाच वाजेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला.जिल्ह्यात आतापर्यंत ५५५.३ मिलीमिटर पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांवर संकट कोसळले होते.

मात्र, पुन्हा एकदा पावसाचे पुनरागमन झाले असून,आता सर्वदूर पावसाने शेतीला दिलासा मिळाला आहे. मात्र काही भागात अति पाण्यामुळे पिकांना धोकाही निर्माण झाला आहे. बहुतांश भागात पिकांमध्ये सतत पाणी साचून राहिल्याने पीकांच्या मुळ्या कुजत आहेत. बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पावसाला सुरूवात झाली होती. गुरूवारी सायंकाळी पुन्हा मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी ढग दाटून आले होते.

बातम्या आणखी आहेत...