आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट संपेना:सततचा पाऊस व पडणाऱ्या रोगांमुळे सोयाबीनचा उतार घटला! भावही कमी

ईट25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरिप हंगामातील नगदी पिक म्हणून ओळख असलेले व वर्षभराचे अर्थकारण ठरलेले पिक म्हणून सोयाबीन पिकाची ओळख आहे.सध्या सोयाबिन पिकाची काढणी झाली असून अनेक ठिकाणी त्याची मळणी सुरू आहे.मात्र या वर्षी या पिकाच्या उत्पादनामध्ये मोठी घट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झालेला आहे. सोयाबिन उत्पादन निम्याने कमी झाले आहे.यास गोगलगायचे संकट,अळीचे आक्रमण,यलो मोझॅक,आणि शेवटी तांबेरा मुळे उत्पादनामध्ये घट निर्माण झाली आहे.खर्चामध्ये मात्र चांगलीच वाढ झाली आहे.त्या बरोबर गतवर्षी पेक्षा दर ही कमी झाला आहे.यामुळे सर्वाचा आथिॅक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

ईट सह परिसारातील पखरूड,ङोकेवाडी,गिरवली,अंजनसोडा,आंद्रुड,जोतीबाचीवाडी,निपाणी,नागेवाडी,माळेवाडी ,घाटनांदुर,चांदवड,आदी गावामध्ये नगदी पिक म्हणून सोयाबिनला पंसती देतात.या नगदी पिकावरच वर्षभराची सर्व गणितं ठरलेली असतात.ईट कृषि मंडळ अंतर्गत सोयाबीनचा १० हजार हेक्टरवर पेरा झाला आहे.वेळेवर पाऊस न झाल्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या. पेरणी झाल्यानंतर जोमात व चांगली उगवण झालेल्या सोयाबिन पिकावर गोगलगायच्या हल्लाने पिक पुरते नष्ट झाले.यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली.यानंतर पिके जोमात आले असता पाऊस गायब झाला. नंतर अळीने हल्ला केला.नंतर पुन्हा यलो मोझॅकच्या तडाख्यात अनेक ठिकाणी सोयाबीनच पिक नष्ट झाले. महाग मोलाची औषध फवारणी करून पिकं वाचवली. पिके शेवटी दाणे भरण्याच्या तयारीत असताना तांबेरा रोंगाच्या हल््ल्यांमध्ये पुर्ण सोयाबिन नष्ट झाले.थोडेफार हाती लागले.पिक काढणीच्या तयारीत असताना परतीचा पाऊस झाला.

या परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे पिके जागेवर सडून गेली.यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.सध्या सोयाबिनची मळणी सुरू आहे.मात्र उतार मध्ये घट निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.याबाबत बोलताना संभाजी खांडेकर हे शेतकरी म्हणाले की, मी गेल्या वर्षी १४ एकर सोयाबीनची पेरणी केली होती.त्यामध्ये मला १९५ कट्टा सोयाबिन झाले होते.या वर्षी १५ एकर मध्ये केवळ १२५ कट्टा सोयाबिन झाले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत खर्च वाढला, पण उत्पादन घटले.... सोयाबिनची मळणी सुरू आहे.मात्र उत्पादनामध्ये घट निर्माण झाली आहे.खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे.गत वर्षी सोयाबिन एकरी ९ ते १० क्विंटलचा उतार मिळाला. यावर्षी मात्र तो उतार ७ ते ८ क्विंटलवर आला आहे.गतवर्षी सोयाबिन काढणी साठी एकरी ३ ते ३ हजार ५०० रू दर होता. मात्र या वर्षी तोच दर ४ हजार ते ५ हजार वर गेला.गतवर्षी सोयाबिन बियाणेची ३० किलो बॅग ३ हजार ते ३ हजार ३०० रूपये होती.त्याच बॅगचा दर यंदा ४ हजार ते ४ हजार ५०० रूपये झाला.पेरणी मध्येही २०० रूपये एकरी वाढ झाली.पण भावामध्ये मोठी घसरण झाली.गतवर्षी सोयाबिनचा दर ७ हजार ते ७हजार ४०० रूपये दर होता.तोच दर यावषीॅ ५ हजार २०० वर आला आहे.यामुळे निघालेलं उत्पादन व झालेला खर्च यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...