आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंचा कर बुडण्याची शक्यता:बाजार समितीच्या जागेत अतिक्रमण झाल्याने‎ व्यापारी आक्रमक,परवाना नूतनीकरण नाही‎

कळंब‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी उत्पन्न बाजार समिती‎ अतिक्रमणाच्या वादात व्यापाऱ्यांनी उडी‎ घेतली असून समिती आवारातील व्यापारी‎ परवाना नूतनीकरण न करण्याचा पवित्रा‎ घेतला आहे. यामुळे बाजार समितीचा‎ लाखोंचा कर बुडण्याची शक्यता निर्माण‎ झाली आहे. यावर समिती प्रशासन काय‎ भूमिका घेते याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागून‎ आहे.‎ कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे‎ कार्यक्षेत्र २७ एकर पेक्षा जास्तीचे असून‎ तेथे काही विशिष्ठ समाजाच्या लोकांनी‎ अतिक्रमण केलेले आहे.

अतिक्रमण‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केलेल्या लोकांकडून व्यापारी वर्गाला त्रास‎ सहन करावा लागत आहे, त्यामुळे त्याचा‎ व्यापारावर दुष्परिणाम होऊन व्यापार‎ दिवसेंदिवस खालावत आहे. अतिक्रमण‎ केलेल्या लोकांकडून वारंवार शेतकरी,‎ वर्गाला येणाऱ्या ग्राहकाला त्रास होत आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎अतिक्रमण धारकांकडून नेहमी‎ शेतकऱ्यांच्या चोऱ्या करणे, बाजार‎ आवारात दारू निर्मिती विक्री करणे अशा‎ बाबी होत असल्याने व्यापारी वर्ग‎ धास्तावला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी‎ दुसरीकडे व्यापार सुरू केलेला आहे.‎

नूतनीकरण न केल्यास ४० लाख कर बुडण्याची शक्यता
‎बाजार समिती येथे १००३ व्यापारी व २०५ हमाल आहेत. बाजार समितीचा परवाना‎ नूतनीकरण सुरू होऊन एक हप्ता झाला आहे, तरी पण एक परवाना नूतनीकरण झाले‎ नाही. अतिक्रमण काढता का नाही, काढले नाही तर कोणीही परवाना नूतनीकरण करणार‎ नाही असा पवित्रा घेतल्याने बाजार समितीचे अस्तित्वात धोक्यात येण्याची शक्यता‎ आहे.नूतनीकरणातून बाजार समितीला प्रतिवर्षी ४० लाखांच्या आसपास कर मिळतो,‎ बाजार समितीचा लाखोंचा कर बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...