आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा आणि शासकीय कार्यालय प्रवेशद्वार परिसरात बेकायदा पद्धतीने अतिक्रमणे करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागासह मुख्य रस्त्यांवर अनधिकृत हातगाडी,फेरीवाले, स्टॉलधारक यांच्या अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. शासकीय कार्यालयांची प्रवेशद्वारे अतिक्रमणधारकांनी गिळकृंत केल्याने अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना वाट शोधून जावे लागते. बेकायदा अतिक्रमणांवर प्रशासन कधी कारवाई करणार, अशी सर्व सामान्य नागरिकांतून मागणी केली जात आहे. शहराच्या मध्यभागातून गेलेल्या मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा अन परिसरात बेकायदा व्यावसायिकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. दिवसातून एक-दोन अपघात होत आहेत. मध्यंतरी तत्कालीन पोलीस निरीक्षक, पालिका प्रशासनाने अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू केली होती. शिवाय रस्त्याच्या लगत मार्किंग करून दुचाकी व वाहन थांबे करण्यात आली होती, मात्र आठवडाभरातच अतिक्रमण मोहीम थंडावल्याने जैसे थे स्थिती पुन्हां निर्माण झाली आहे.
कारवाईत सातत्य असणे गरजचे असताना या बाबत प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक, स्टॉलधारक,हॉटेल व्यावसायिक, ज्यूस, फळ व हातगाडीवाल्यांनी अतिक्रमणे केली असल्याने रस्त्यांवर पादचारी यांना चालणे ही अवघड झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरच दैनंदिन भाजीपाला विक्री करण्यात येत असल्याने वाहतूक खोळंबा होतोय. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्ता पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला आहे. शहरात बहुतांश अतिक्रमणांवर राजकीय पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने ही अतिक्रमणे वारंवार उभी राहत आहेत. याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने अनाधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हातगाड्या,भाजीपाला विक्रेते असतात.
शहरात पार्किंग, भाजीमंडईला जागाच नाही
महामार्गालगत वसलेल्या शहरातस्वतंत्र भाजी मंडई साठी जागा नाही. मुख्य बाजारपेठ, आरोग्यनगरी यासह राष्ट्रीय महामार्गाच्या आसपास वहानाच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेलाच वाहनाची बेशिस्त पार्किंग अडचणीची ठरत आहे. ॲटो थांबे, अप्रशिक्षित चालक, विना परवाना वाहन, परवाना नेसलेले अन सुसाट धावणारे दुचाकी यांच्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने समस्यांवर कायम स्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे.
कारवाईत सातत्य आवश्यक
याबाबत व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन होळे म्हणाले की, पालिका प्रशासनाने काही वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गांवरील वाढतेअतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. सीमारेषा अखून दिली होती. त्याच्या बाहेर आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची सुचना देण्यात आल्याने काही दिवस महामार्गाने मोकळा श्वास घेतला, मात्र पुन्हां जैसे थे स्थितीमुळे वाहतूक कोंडी कायम आहे. पालिका अन पोलिस प्रशासनाकडून कारवाईत सातत्य ठेवल्यास शहराचे वैभव खुलून दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.