आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचण:कृषी विभागाच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळेना ; बी-बियाण्यांच्या महागाईसह शेतकऱ्यांना तुटवड्याचा फटका

ईटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान खात्याने मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी बी-बियाणे, खते घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रामध्ये गर्दी करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना हवे असलेले डीएपी (१८.४६), १०.२६.२६, १२.३२.१६ ही हवी असणारी खते तसेच निर्मलचे उडीद, महाबीजचे सोयाबीन बियाणे अद्याप बाजारात मिळत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. प्रथमच बी-बियाणाच्या महागाईचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कृषी विभागाकडून खरिपाचे नियोजन झाल्याचे दिसत नाही. मान्सूनपूर्व पावसाने कुठे कमी तर कुठे जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी वर्ग आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी तयारी करू लागला आहे. यामुळे पुन्हा खते, बियाण्यांची टंचाई होऊ नये, यासाठी आतापासून खत, बियाणे, खरेदीसाठी कृषी सेवा दुकानात गर्दी करू लागले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना हवे असणारे खते अद्यापही बाजारात व दुकानात आले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. शेतकऱ्यांना हवे असणारे १८.४६ (डी.ए.पी.), १०.२६.२६, १२.३२.१६ हे खते कोणत्याच कंपनीच्या दुकानात नाही. ज्या दुकानात आहेत, त्या दुकानदारांकडून इतर बॅग घेण्यासाठी आग्रह केला जात आहे. तसेच निर्मलचे उडीद बियाणे, महाबीजचे सोयाबीन आदी बियाणे अद्याप उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बियाण्यांशिवाय रिकाम्या हाती परत एकीकडे शेतमालाच्या भावात घसरण होत आहे तर दुसरीकडे बी-बियाणे व खताच्या वाढत्या किमतीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतकरी वर्ग पेरणीची तयारी करत आहे. मात्र, सुरुवातीलाच बियाणे व खते नसल्याचे समोर येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना बियाणे खरेदीशिवाय रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

इतर खते घेण्याची बळजबरी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच कृषी विभागाचे नियोजन ढासळल्याचे दिसत आहे. सोयाबीन बियाणे बाजारात आले आहे. मात्र, खते अद्याप आले नाहीत. जे पाहिजे आहे ते खत नसल्यामुळे दुकानदारांकडून इतर खत घेण्याची बळजबरी केली जात आहे. तसेच ज्या कृषी दुकानात १८.४६,१॰.२६.२६ ही खते आहे. ती खते दिली जात नाहीत. त्या खतांबरोबर इतर बियाणे बॅग, छोट्या खताच्या बॅगची शक्ती शेतकऱ्यांना केली जात आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.

बातम्या आणखी आहेत...