आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील तेर महसूल मंडळात १६ जूनपर्यंत केवळ १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने जिल्ह्यासह तेर मंडळातील पेरण्या खोळंबल्या आहेत. रोहिणी नक्षत्र कोरडे गेले असून मृगही बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
हवामान खात्याने यावर्षी पाऊस चांगला असल्याचा अंदाज महिनाभर आधीच जाहीर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. तसेच खते व बियाणे खरेदी करुन पेरणीही तयारी पूर्ण केली आहे. तेर महसूल मंडळातील तेर हे मोठे गाव असून ३२४४.६० हेक्टर एकूण क्षेत्रापैकी २७०३ हेक्टर क्षेत्र सोयाबीन, मूग, तूर पेरणीसाठी शेतकऱ्यांनी तयार करुन ठेवले आहे. मृग नक्षत्रात पावसाने चकवा दिल्याने सोयाबीन पेरणी मृग नक्षत्रात पेरणी झाली नाही. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. परंतु पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.