आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागरुक नागरिक अन् आरोग्य विभागाच्या सतर्कतेने चार वर्षांपासून जिल्ह्यातील मातांचा मृत्युदर घटत आहे. २०२१-२२ मध्ये २०.७ टक्क्यांवर असणारा हा दर २०२२-२३ (फेब्रुवारीपर्यंत) मध्ये १० टक्क्यांवर आला आहे. देशात काही वर्षांपासून माता मृत्यू दरात (एमएमआर) घट होत आहे. भारतीय महानिबंधकाने माता मृत्यूदरासंदर्भात दिलेल्या माहितीत भारताच्या मातामृत्यू दरामध्ये १० अंकांची घट झाली आहे. केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांनी एमएमआरमध्ये १५ टक्क्यांपेक्षा जास्त घट दर्शवली आहे.
महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्याने गतवर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी घट दर्शवली आहे. माता व बालमृत्यू होऊ नये म्हणून आरोग्य विभाग प्रयत्नरत असला तरी महिलांनीही गरोदरपणात काळजी घेणे गरजेचे आहे. प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्राव होणे, उच्च रक्तदाब व झटके येणे, सिझर झाल्यानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे अधिक मातांचा मृत्यू होतो. गरोदरपणात किमान चार वेळा रुग्णालयात तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये वजन वाढ, रक्तदाब, रक्त तपासणी, लघवी तपासणी व किमान तीन सोनोग्राफी तपासणी करणे आवश्यक आहे. आई होणे हे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण असतो. परंतु, अनेक गर्भवती माता प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. नियमित तपासणी व त्रास सुरू झाल्यानंतर वेळेत रुग्णालयात दाखल करण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक महिलांचा मृत्यू ओढवतो. हा धोका टाळण्यासाठी गर्भधारणा झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे तपासणी करावी. धाराशिव जिल्ह्यात वर्षभरात जवळपास २५ हजार प्रसूती होतात. राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात माता मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
गर्भरपणात लोह, फॉलिक अॅसिड, कॅल्शियमचे सेवन करावे
एखाद्या मातेचा मृत्यू झाल्यास माता मृत्यू अन्वेषण समितीकडून याची चौकशी केली जाते. मृत्यूची कारणे शोधून त्यावर उपाययोजना केल्या जातात. परंतु, मृत्यू होऊच नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांनी गरोदरपणात लोह व फॉलिक अॅसिड आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचे सेवन करावे. आहार, व्यायामासह वेळेनुसार आरोग्य तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. यामुळे गर्भातील बाळाची स्थिती व गर्भाची अवस्था समजते.
गरोदरपणात किमान चारदा तपासणी आवश्यक
महिलांनी गरोदरपणात किमान चार वेळा आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये वजनवाढ, रक्तदाबासह किमान तीन सोनोग्राफी करणे गरजेचे आहे. प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्राव होणे, उच्च रक्तदाब व सिझर झाल्यानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे अधिक मातांचा मृत्यू होतो.- डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.