आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:ढोराळे ओढ्यावरील पूल झाल्याने वारकऱ्यांत समाधान ; गोरोबाकाकांच्या पालखीचा मुक्काम गावी

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत श्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या पंढरपूर पायीवारी सोहळ्यातील पालखी मार्गावर असणाऱ्या ढोराळे (ता. बार्शी) येथील मोठ्या ओढ्यावरील पुलाचे बांधकाम पुर्ण झाल्याने वारकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या ओढ्यावरील पुलासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी पाठपुरावा केला होता.

संत गोरोबाकाकांचा पालखी सोहळा रविवारी (दि.३०) रोजी ढोराळे या गावी पोहोचला. त्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री दिलीप सोपल, उस्मानाबाद तालुका शिवसेनाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, ढोराळे येथील बार्शी तालुका शिवसेना प्रमुख प्रवीण काकडे यांच्या उपस्थितीत पुलाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. या पुलासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, तालुका प्रमुख सोमाणी यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री व उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे गडाख यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी तात्काळ या पुलासाठी २ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला हाेता.

ढोराळे व यावली गावला जोडणाऱ्या ओढ्यावर पूल नसल्याने वारकऱ्यांना जीव मुठीत धरून कलईमधून पैलतीरावर जावे लागत होते. हा पुल बांधण्यात आल्यामुळे वारकऱ्यांच्या सोबतच या भागातील अडचण दूर झाली आहे. संत गोरोबाकाकांंच्या पालखीचा प्रवास शेतशिवार बांधावरून व कच्चा रस्त्याने असल्याने वारकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तरीही वारकरी आनंदाने ज्ञानोबा तुकारामांचा गजर करीत पंढरपूरला जातात.

बातम्या आणखी आहेत...