आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असहकार:मातोळा ग्रामसेवकांच्या असहकारामुळे कामे थांबली

उमरगा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मातोळा येथील ग्रामसेवक पदभार देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांना नोटीस बजावली असून पदभार देण्यात येत असलेल्या ग्रामसेवक यास रजेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान संबंधित ग्रामसेवकांनी एक महिना होत आले तरी अद्याप खुलासा दिला नाही.

तालुक्यातील कोळसूर (गुं) येथील ग्रामसेवक बी एस माने यांच्याकडे मातोळा ग्रामसेवक पदाचा पदभार देण्यात आले होता. त्यांनतर २०२२ च्या समुपदेशनानुसार डिग्गी येथील कार्यरत ग्रामसेवक डी व्ही शिनगारे यांचे प्रशासकीय बदली मातोळा येथे झाली असून श्री हे माने पदभार देत नसल्याने गटविकास अधिकारी यांनी २८ जून रोजी पदभार देण्यात टाळाटाळ करीत असल्याने तीन दिवसात खुलासा देण्यात यावा अन्यथा शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असे नोटीस देवून म्हटले आहे.

नोटीस देवून महिना झाला तरीही खुलासा देण्यात आलेला नाही. याबाबत चौकशी केली असता दोन्ही ग्रामसेवक यांना अंतिम नोटीस देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...