आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील तहसील, पंचायत समिती, नगरपरिषद, आरोग्य व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारल्याने सर्वच विभागात शुकशुकाट दिसून आला. यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांची शासकीय कार्यालयांमधील कामे रखडली आहेत. उमरगा तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना तसेच परतावे लागले.
तहसील कार्यालयातील युवराज शिंदे, सूरज अहंकारी, विनोद स्वामी, पंकज कुलकर्णी, मुदगल कुलकर्णी, एजाज पटेल यांच्यासह सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. उमरगा पंचायत समितीत शुकशुकाट होता. ग्रामसेवक संघटनेचे कर्मचारी धाराशिव येथील मोर्चात सहभागासाठी गेले, अन्य कर्मचारी येथील संपात सहभागी झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पंचायत समितीचे एल. एस. जकेकुरे, जी. आर. माळी, एस. एम. डावरे, व्ही. जी. लोंढे, एम. एस. चव्हाण उपस्थित होते.
पर्यायी व्यवस्था
शहरातील अनेक शाळांतील शिक्षकांसह कर्मचारी संपावर असल्याने तारांबळ उडाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, भारत विद्यालय, आदर्श विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, जिल्हा परिषद शाळेसह सर्वच शाळांतील शिक्षक संपावर गेले होते. दरम्यान, याचा दहावीच्या परीक्षेवर परिणाम होणार नसल्याचे गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी सांगितले. दहावीच्या परीक्षेसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे, असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.