आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:यंदाच्या पावसाने जालना, बीडच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यात शेतीचे जास्त नुकसान

हरेंद्र केंदाळे | उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात यंदा १३७ टक्के पाऊस झाला. पावसाची सरासरी ६०३.१० मिमी असून प्रत्यक्षात ८२९.३० मिमी पाऊस (२१ ऑक्टोबरपर्यंत) पडला. यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तिघांचा मृत्यू झाला, ९४ जनावरे दगावली. २८९ घरांची पडझड झाली. बीड, जालना जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्यात पाऊस कमी झाला तरी नुकसान अधिक झाले.

गतवर्षीच्या तुलनेत पावसाची आकडेवारी कमी असून मुलभूत सुविधांचे नुकसानही कमी झाले. गतवर्षी शेकडो रस्ते, पूल, घरं बाधित झाली होती. मृतांची आकडेवारीही अधिक होती. यंदा शेतीचे अधिक नुकसान झाले. प्रारंभी कमी पाऊस, नंतर जास्तीचा पाऊस, त्यानंतर सततचा पाऊस आणि दरम्यान गोगलगायींसह पिकांवर रोगांच्या हल्ल्याने पिकांचे नुकसान झाले. प्रारंभी प्रशासनाकडून विलंबाने पंचनाम्यांमुळे काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित रहावे लागले होते. दुसरीकडे पावसाचा मारा सुरुच राहिल्याने काढलेले सोयाबीनही पाण्यात गेले. आता कोठे शेतकऱ्यांना २०२० पासूनची मदत आणि विमा रक्कम मिळण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

आणखी निधीची गरज
प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीची शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असली तरी, नुकसानीपुढे मागणीचे आकडे हे तोकडे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीने निधी मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

आणखी निधीची गरज
प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीची शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असली तरी, नुकसानीपुढे मागणीचे आकडे हे तोकडे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीने निधी मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

४२ पैकी २७ मंडळात अतिवृष्टी
जिल्ह्यातील ४२ मंडळांपैकी २७ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात दोन वेळा जिल्ह्यातील सहा मंडळात अतिवृष्टी झाल्याचे समोर आले. तर एका मंडळात चार वेळा अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नुकसानीचा आकडा अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

बातम्या आणखी आहेत...