आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात २३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १२२ तर सदस्यांसाठी ६९० अर्ज दाखल झाले होते. बुधवारी (दि.७) अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी ५३ सरपंचपदाचे तर १७० सदस्यांनी अर्ज मागे घेतल्याने आठ गावात दुरंगी, नऊ गावात तिरंगी लढती होत आहेत. महालिंगरायवाडीत सदस्य बिनविरोध निघाले असून सरपंचासाठी दोघांत लढत होत आहे.
तालुक्यात २३ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणूकीला सुरुवात झाल्यापासून ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने अनेक इच्छुकांनी स्थानिक आणि राजकीय जुळवाजुळव करून उमेदवारांनी पदरात पाडून घेतली होती. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक विभागाच्या बाहेर अनेकांची मनधरणी करत असल्याचे चित्र दिसून आले.
२३ गावात सरपंचपदासाठी १२२ जणाचे अर्ज वैध ठरले होते, त्यापैकी ५३ जणांनी माघार घेतल्याने आता ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर ६९० सदस्यांपैकी ६८५ अर्ज वैध होते, त्यात १६५ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ५२० उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान महालिंगरायवाडीत सात सदस्यांसाठी सात उमेदवार असल्याने सदस्य बिनविरोध तर सरपंचासाठी निवडणूक होत आहे.
मळगीवाडी, कोराळ व भुयार चिंचोली या गावात काही सदस्य बिनविरोध निघालेले आहेत. सरपंच पदासाठी कंटेकुर, कलदेवनिंबाळा, चिंचोली जहागीर, त्रिकोळी, भुयार चिंचोली/काटेवाडी, मळगीवाडी, मळगी,वरनाळवाडी या आठ गावात दुरंगी लढत होत असून आनंदनगर, केसरजवळगा, कोराळ, येणेगूर, औराद, बेळंब, धाकटीवाडी, भुसणी/भुसणीवाडी, कोथळी या नऊ गावात तिरंगी तर एकुरगा/एकुरगावाडी,नारंगवाडी,आलूर, ाडज, सुंदरवाडी या पाच गावात बहुरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. तहसीलदार प्रसाद चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली निवडणूक विभाग नायब तहसीलदार रतन काजळे, नायब तहसीलदार शिवाजी कदम, लिपिक विनोद स्वामी, व्यंकट सगर, एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निर्णय अधिकारी, संगणक ऑपरेटर, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
गाव पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली, कार्यकर्ते सक्रिय
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता गाव पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राजकीय पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायतची निवडणूक लढविली जात नसली तरी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीत सक्रिय झाल्याने राजकारण चांगलेच तापले. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर होत असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाची ही रंगीत तालीम म्हणून विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी ही याकडे गांभीर्याने पाहत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.