आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रामतीर्थ ध्यान मंदिरात दुर्गा सप्तशती पाठ सुरू; नळदुर्ग परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम

नळदुर्ग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे रामतीर्थचे महंत श्री विष्णू शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रीनिमित्त दुर्गासप्तशती पाठ सुरू करण्यात आला आहे.२ ते १० एप्रिल या कालावधीत हा दुर्गासप्तशती पाठ सुरू राहणार आहे. नळदुर्ग शहर व परीसरातील भक्तांनी या दुर्गासप्तशती पाठाचा लाभ घ्यावा असे आवाहन महंत श्री विष्णू शर्मा महाराज यांनी केले आहे.दुर्गासप्तशती पाठामुळे समाजातील अनिष्ठ प्रकारांचा नाश होतो. या दुर्गासप्तशती पाठामुळे भुत, पिशाच्च, राक्षसी प्रवृत्ती यांचा नाश होऊन माणसाच्या आयुष्यामध्ये सुख, समृध्दी येते. दुर्गासप्तशती पाठ हे पवित्र असुन वातावरणामध्ये ऊर्जा निर्माण करणारे पाठ आहे असे श्री विष्णू शर्मा महाराज यांनी म्हटले आहे.

याठिकाणी दिवसभर अनुष्ठानही करण्यात येत आहे.नळदुर्ग शहर व परीसरातील भक्तांनी या धार्मिक विधीला सहकुटुंब, सहपरीवार उपस्थित राहुन या पवित्र दुर्गासप्तशती पाठाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रामनवमीपर्यंत कार्यक्रम
२ ते १० एप्रिल या कालावधीत श्री क्षेत्र रामतीर्थ येथील ध्यानमंदिरात या दुर्गासप्तशतीचा पाठ सुरू आहे. सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत श्री दुर्गा मातेचा दुर्गासप्तशती पाठ सुरू राहणार आहे. राजस्थान येथील पंडित श्री महावीर प्रसाद महाराज हे दुर्गासप्तशतीचा पाठ करीत आहेत. त्याचबरोबर नळदुर्ग येथील सुनील महाराज हेही या दुर्गासप्तशतीचा पाठ करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...